top of page

वेल्डर विभाग

श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
संलग्नतेचे प्राधिकरण
NCVT
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
उपलब्ध जागा 
40
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
कालावधी 
एक वर्ष
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण

आपण या व्यवसायात काय शिकाल ?

  • आर्क वेल्डींग, पाईप वेल्डींग, कॉपर वेल्डींग, ब्रॉझ वेल्डींग, ऑल्युमिनियम वेल्डींग,सोल्डरींग, स्पॉट वेल्डींग, गॅस
    वेल्डींग, प्लाझ्मा वेल्डींग.

  • संपूर्ण धातूशास्त्राचा सविस्तर अभ्यास, विविध वेल्डींग तपासणी, वेल्डींगमधील दोष व दुरूस्ती.

  • सर्व फॅब्रिकेशन वर्क, खिडक्यांच्या जाळ्या, लोखंडी दरवाजे, कपाट, चॅनल गेट, कॉट, शटर, लोखंडी टेबल, खुर्ची.

  • सर्व प्रकारची वेल्डिंगची कामे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक रित्या शिकवली जातात

  • त्याच पद्धतीने गॅस मेटल आर्क वेल्डिंग व अंडरवॉटर वेल्डिंग सुद्धा शिकवली जाते तसेच तुम्हाला डिझाईनचे बेसिक सुद्धा शिकवले जातात

48.png

स्वयं रोजगार उपलब्ध्द संधी कोणत्या ?

  • स्वतःचे वर्कशॉप/कार्यशाळा माध्यमातून स्वयंरोजगार सुरू करता येतो.

  • सध्या शासनाचा स्किल इंडिया या योजनेद्वारे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन सुद्धा मदत करते

  • वेल्डिंगच्या सामानाचे दुकान सुद्धा तुम्हाला टाकता येते आणि त्यामधून स्वयंरोजगार उपलब्ध होतो

47.png
44.png

प्रशिक्षणानंतर उपलब्ध्द रोजगार संधी कोणत्या ?

  • शासकीय कार्यालयाच्या कार्यशाळेत, केंद्र शासनाच्या कार्यशाळा, एस. टी., रेल्वे, खाजगी कारखान्यात
    मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध, एस. एस. सी. नंतर आय. टी. आय.निदेशक रोजगार संधी

  • सरकारी नोकरीसाठी केंद्र शासनाच्या अंडर मध्ये असलेल्या शासकीय कंपन्या जसे की इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड रेल्वे यासारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते.

  • तसेच आर्मी, नेव्ही, एअर फोर्स मध्ये सुद्धा नोकरी मिळते तेथे असलेल्या टेक्निकल विंग मध्ये ही नोकरी मिळते.

  • त्याच पद्धतीने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, यासारख्या गौरवशाली संस्थांमध्ये तुम्ही काम करू शकता

46.png

 पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या ?

  • अप्रेंटिसशिप नंतर सीआयटीएस म्हणजेच निर्देशक प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निर्देशक म्हणून काम करू शकतात.

  • त्याच पद्धतीने मुक्त विद्यापीठामधून पदवीसाठी प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो.

  • त्याच पद्धतीने वेल्डर म्हणजेच संध्याता विभागातून प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सुद्धा करू शकता

bottom of page